Description
रामदास (तात्या) बहिरू दातीर
प्रभाग क्र. 27 – नाशिक महानगरपालिका
प्रिय मतदार बांधवांनो, बंधू-भगिनींनो,
आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार !
मी आपला रामदास (तात्या) बहिरू दातीर एका साध्या शेतकरी कुटुंबातील तरुण ते एक यशस्वी व्यावसायिक पण मनापासून लोकांसाठी झटणारा एक सेवाभावी कार्यकर्ता गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मी निःस्वार्थपणे काम करत आलो आहे.माझी ओळख ही प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या तुमच्या विश्वासू साथीदाराची आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरी हक्क, स्थानिक समस्या, नागरिकांच्या अडचणी या सर्वांसाठी मी नेहमीच ठामपणे आवाज उठवला आहे. नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सौ. सीमा ताई महेश हिरे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि सततच्या मार्गदर्शनातून आम्हाला भारतीय जनता पक्षात कार्य करण्याची नवी प्रेरणा मिळाली. त्यांच्या विकासनिधीतून प्रभाग क्रमांक २७ मध्ये सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक रुपये मंजूर होऊन अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. कोविड काळामध्ये मोफत लसीकरण केंद्र उभारणी, जेष्ठ नागरिकांचे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन, रक्तदान शिबिरे, गेल्या ३० वर्षापासून नवरात्र उत्सव, गणेशोत्सव, महापुरुषांचे जयंती उत्सव, सोहळे असे अनेक उपक्रम राबवत आलेलो आहे तसेच अनेक लोक आंदोलनांमध्ये सहभागी होत तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी रात्रंदिवस लढलो, लढत आहे, आणि पुढेही लढत राहिल. प्रभागातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांतून त्यांच्या प्रगतीसाठी संधी निर्माण करणं हा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. स्पष्टवक्तेपणा , प्रामाणिकपणा, सर्वसमावेशकता, काम करण्याची तळमळ
हिच माझी कार्यशैली आणी माझी मूल्ये राहिली आहे. काम करताना सातत्य आणि निष्ठा, निर्णय घेताना सर्वांच्या भल्याचा विचार हीच माझी ओळख हीच माझी ताकद. आपल्या प्रभागाचा विकास हीच माझी दिशा….
✔ आधुनिक व टिकाऊ सुविधा ✔ स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरण ✔ रस्ते, प्रकाशयोजना, नाले, पाणी आणि मूलभूत सुविधांची भक्कम उभारणी ✔ युवकांसाठी कौशल्यविकास व रोजगाराच्या संधी ✔ महिलांसाठी सुरक्षितता, सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यक्रम ✔ आरोग्य, शिक्षण व डिजिटल सुविधांचे बळकटीकरण ✔ तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणारी पारदर्शक संवादव्यवस्था
या सेवा देण्या साठी मी सदैव कटीबद्ध असेल. माझं आणि तुमचं नातं कधीही वचनांवर उभं नाही तर… ते उभं आहे विश्वासावर….
तुमच्या प्रत्येक अडचणीच्या क्षणी तुमच्यासाठी धावून जाणं हीच माझी ओळख आणि हीच माझ्या लढान्याची प्रेरक शक्ती आहे. आज मला हवी आहे तुमची साथ, आणि तुमचे आशीर्वाद… या पुढे हि माझे काम मी, प्रामाणिकपणे आणि निश्चयाने, करणारच हे माझं तुम्हाला वचन आहे.
आपलाच,
रामदास (तात्या) बहिरू दातीर
उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, नविन नाशिक
प्रभाग क्रमांक 27, नाशिक महानगरपालिका





































































































































































