अंबड येथे महिला कामगारांना ई-श्रम कार्डचे वितरण

अंबड, नाशिक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महिला कामगारांना ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले. केंद्र सरकारच्या कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांना ई-श्रम कार्डचे महत्व समजावून सांगण्यात आले. ई-श्रम कार्डमुळे कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ, अपघात विमा संरक्षण तसेच सामाजिक सुरक्षेच्या सुविधा मिळतात, अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिला कामगारांना ई-श्रम कार्ड प्रदान करण्यात आले. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असून, त्याचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. रामदास (तात्या) दातीर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, मा. नगरसेवक तथा भाजपचे सरचिटणीस श्री. राकेश राजेंद्र दोंदे यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

Previous Post
अंबड येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
Next Post
A/B Form मिळणार कुणाला? नाशिकमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात राजकीय घडामोडींमुळे निवडणुकीला चढला रंगतदार रंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.
You need to agree with the terms to proceed

Menu