नाशिक निवडणूक 2025 : प्रचाराचा केंद्रबिंदू ठरतोय WhatsApp

नाशिक शहरात निवडणुकीचा माहोल रंगताना एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे प्रचाराची दिशा आता पूर्णपणे बदलली आहे. एकेकाळी पोस्टर, बॅनर, सभा आणि प्रचार मिरवणूकांवर अवलंबून असलेला प्रचार आता फोनच्या स्क्रीनवर येऊन थांबला आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांचा खरा ‘स्टार प्रचारक’ म्हणजे WhatsApp, कारण याच माध्यमातून संदेश वेगाने, थेट आणि मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचतो.

गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये डिजिटल वापर झपाट्याने वाढला आहे. जवळपास प्रत्येक घरात स्मार्टफोन आहे; WhatsApp ग्रुप, स्टेटस, चॅनेल आणि ब्रॉडकास्ट लिस्ट ही निवडणूक प्रचाराची नवी शस्त्रे बनली आहेत. पूर्वी गावातला प्रभावी नेता ज्या पद्धतीने 100–200 लोकांपर्यंत पोहोचायचा, त्या तुलनेत एक WhatsApp स्टेटस 1,000 पेक्षा अधिक लोकांपर्यंत काही सेकंदांत पोहोचू शकतो. त्यामुळे उमेदवारांना आता पारंपरिक प्रचारापेक्षा डिजिटल पोहोच जास्त महत्त्वाची वाटू लागली आहे.

यातील सर्वात मोठा बदल म्हणजे  प्रत्येक सामान्य मतदार स्वतःच उमेदवाराचा स्टार प्रचारक’ बनत आहे. एखाद्या उमेदवाराचा संदेश, कामांची माहिती किंवा निवडणूक अपडेट व्हॉट्सअॅपवर शेअर केलं की ते तात्काळ शेकडो लोकांपर्यंत पोहोचते. मतदार ते प्रचारक” असा रोल एका क्लिकमध्ये बदलतो. नाशिकमधील अनेक उमेदवार आता खास व्हिडीओ, बाइट्स, प्रकल्पांची माहिती आणि आकर्षक क्रिएटिव्ह तयार करून थेट WhatsApp साठीच डिझाईन करतात.

WhatsApp स्टेटसने दिलेली पोहोच ही आता मोठ्या सभांइतकी प्रभावी ठरत आहे. विशेषतः तरुण मतदार आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कारण हा वर्ग टीव्हीवर बातम्या पाहण्यापेक्षा मोबाइलवर येणाऱ्या अपडेट्सवर जास्त विश्वास ठेवतो. तुमचा मित्र, शेजारी किंवा नातेवाईक स्टेटस टाकतो त्याचा विश्वास आणि त्याची शिफारस प्रचाराला वेगळीच ताकद देते.

यावरच थांबत नाही नाशिकमधील अनेक राजकीय टीम आता डेटा आधारित WhatsApp स्ट्रॅटेजी तयार करत आहेत. कोणत्या प्रभागात कोणते मुद्दे जास्त महत्वाचे आहेत, कोणत्या भागातील मतदार कोणत्या वेळेला अधिक सक्रिय असतात, कोणत्या ग्रुपमध्ये अधिक एंगेजमेंट मिळते हे सर्व विश्लेषण आता प्रचाराचा भाग बनत आहे. पारंपरिक ‘स्टार प्रचारक’ एका वेळी एका सभेत बोलू शकतो; पण WhatsApp हजारो लोकांपर्यंत दर मिनिटाला पोहोचतो. त्यामुळे WhatsApp आता Silent but powerful स्टार प्रचारक बनले आहे.

“NashikElection.in वर मतदार कोणते मुद्दे प्राधान्याने शोधत आहेत, कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा होत आहे आणि कोणत्या उमेदवारांविषयी माहितीची मागणी वाढत आहे, याचे रिअल-टाइम निरीक्षण केले जात आहे.”  या डिजिटल ट्रेंडमुळे असे स्पष्ट होते की नाशिकची यंदाची महानगरपालिका निवडणूक मोठ्या प्रमाणात WhatsApp-आधारित असणार आहे.

शेवटी एकच
निवडणूक प्रचार आता रस्त्यांवर नाही, तर WhatsApp च्या स्क्रीनवरून धावतो !
आणि तुमचे एक स्टेटस, एक शेअर किंवा एक मेसेज मोठा फरक घडवू शकतो.

👉 नाशिकचे अपडेट्स, प्रभागनिहाय माहिती आणि उमेदवारांची प्रोफाइल्स पाहण्यासाठी दररोज भेट द्या: NashikElection.in

Previous Post
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला !!! आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस कामगिरीचे विश्लेषण
Next Post
नाशिकमध्ये आगामी निवडणूकीत सोशल मीडियाची भूमिका निर्णायक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.
You need to agree with the terms to proceed

Menu