
प्रभागाचे नाव: शिवाजीनगर परिसर , धृव नगर, श्रमिक नगर, धर्माजी कॉलनी, मोतीवाला कॉलेज.
लोकसंख्या: ४७,८३५
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ७,०७९
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ३,५११
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
शिवाजी नगर, धृव नगर, श्रमिक नगर
धर्माजी कॉलनी, मोतीवाला कॉलेज.
सीमा:
उत्तर: मनपा हद्दीपासून उजवा तट कालव्याने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन ध्रुव नगर पूर्वेकडील नाल्यापर्यंत.
पूर्व: ध्रुवनगरचा पूर्वेकडील नाला व उजवा तट कालवा जंक्शनपासून दक्षिणेकडे नाल्याच्या हद्दीने जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन भवर वसाहत सोडून एमआयडीसी हद्दीने सुयोजित बायोटेक जवळील महादेव मंदिरापर्यंत. तेथून दक्षिणेकडे एमआयडीसी हद्दीच्या रस्त्याने जाऊन पश्चिमेकडील श्रमिक नगर परिसर घेऊन सातमाऊली बस स्टॉपपर्यंत.
दक्षिण: एमआयडीसी हद्दीच्या रस्त्याजवळील सात माऊली बस स्टॉपपासून पश्चिमेकडे रस्त्याने जाऊन उत्तरेकडील सात माऊली मंदिर परिसर घेऊन जोगेश्वरी संकुलपर्यंत. तेथून दक्षिणेकडे जाऊन श्रीरामकृपा, साईप्रसाद निवास घेऊन जोगेश्वरी किराणा पावेतो. तेथून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने जाऊन त्रिमुर्ती रो-हाऊस घेऊन पुढे रेणुकामाता चौकातून पुढे ओमशिवशक्ती अपार्टमेंट पर्यंत. तेथून उत्तरेकडील चंद्रमयी अपार्टमेंट पर्यंत तेथून पश्चिमेकडे जाऊन साईबाबा चौकातून श्री हाईटस इमारतीपर्यंत. तेथून उत्तरेकडे जाऊन धनदाई रोहाऊस घेऊन विजया हाईटस घेऊन नियोजीत ३० मी. डी.पी. रस्त्यापर्यंत (पिंपळगाव बहुला स.नं. १२६ च्या हद्दीपर्यंत).
पश्चिम: पिंपळगाव बहुला शिवारातील स.नं. १२६ च्या पूर्व हद्दीपासून नियोजित ३० मीटर डी.पी. रस्त्याच्या हद्दीने उत्तरेकडे जाऊन पुर्वेकडील परिसर घेऊन गंगापूर-पिंपळगाव शीव पावेतो. तेथून गंगापूर पिंपळगाव शिवेने पश्चिमेकडे जाऊन मनपा हद्दीपावेतो. तेथून उत्तरेकडे जाऊन मनपा हद्दीने नाशिक उजवा तट कालव्यापर्यंत.




