प्रभाग २६ शिवसेना ( शिंदे गट)

प्रभागाचे नाव: खुटवड नगर, शिवशक्ती चौक, यमुनानगर, डी.जी.पी. नगर क्र. ३, चुंचाळे परिसर, जाधव संकुल, रामकृष्ण नगर
लोकसंख्या: ५०,८९५
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ४,७९०
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ३,६९५
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
खुटवडनगर, डी.जी.पी.नगर, क्र. ३, शिवशक्ती चौक, नवजीवन डे स्कुल
मोगल नगर, जनक नगरी, आम्रछाया सोसायटी, साळुंखेनगर
चुंचाळे गाव, जाधव संकुल, रामकृष्ण नगर
गोदावरी नगर, विराट नगर, खान बंगला
सीमा:
उत्तर: नासर्डी नदी पासून हॉटेल अमृत गार्डन घेऊन त्रंबक-नाशिक रस्त्यापर्यत. तेथून त्रंबक-नाशिक रस्त्याला उजवीकडे (पूर्वेकडे) वळून नाशिककडे पपैया नर्सरी पर्यंत. तेथून उत्तरेकडे वळून सातपूर लिंक रस्त्याने दक्षिण दिशेने नासर्डी नदी पर्यंत. तेथून नासर्डी नदी ओलांडून डाव्या बाजूने वळून नासर्डी नदीच्या काठाने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन आयटीआय पूल ओलांडून नासर्डी नदीच्या काठाने दक्षिणेकडील यमुना नगर, बरुबाबा नगर, शिवशक्ती चौक घेऊन शिवशक्ती चौकाकडून (दक्षिणेकडून) येणाऱ्या नाला व नासर्डी नदीच्या संगमा पर्यत.
पूर्व: नासर्डी नदी व शिवशक्ती चौक नाल्याच्या संगम पासून दक्षिण दिशेने डी.जी.पी. नगर कडे जाणाऱ्या नाल्याने पश्चिमेकडील भाग घेऊन डाव्या बाजुकडील निशांत सोसायटी पर्यंत. तेथून उजवीकडे वळून उत्तरेकडील भाग घेऊन आयटीआय ते डीजीपी नगर, १८ मीटर डी.पी. रोड ते उत्तरेकडील भाग घेऊन सातपूर शीव नाल्या पर्यत. तेथून नाल्याने दक्षिणेकडे जातांना पश्चिमेकडील भाग घेऊन खान बंगला पर्यत. तेथुन नाल्याने सातपूर ते एक्सलो पॉईंट मुख्य रस्त्यापर्यत.
दक्षिण: मुख्य रस्ता ओलांडून नाल्याने पश्चिमेकडील भाग घेऊन चुंचांळे गाव १८ मी. डी.पी. रस्त्यापर्यंत. नाल्यावरील चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या १८ मी. डी.पी. रस्त्याने पश्चिमेला जाऊन उत्तरेकडील रामकृष्ण नगर, पांजरापोळ, जुने चुंचाळे गाव, म्हाडा कॉलनी भाग घेऊन मनपा हद्दी पर्यत.
पश्चिम: चुंचाळे गावाकडून मळयाकडे येणाऱ्या १८ मी.डी.पी. रस्त्याने मनपा हद्दीपासून उत्तरेकडे जातांना पूर्वेकडील भाग घेऊन नासर्डी नदी पर्यत.

Menu