Description
प्रिय प्रभागातील भगिनींनो, बंधूंनो आणि आदरणीय ज्येष्ठ नागरिकांनो,
प्रभाग क्रमांक 27 (अ) हा यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने माझी पत्नी सौ. प्रियंकाताई राकेश दोंदे या आपल्या सेवेसाठी नवनिर्मितीच्या भावनेने आपल्यासमोर येत आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आपण मला दिलेला प्रचंड पाठिंबा, विश्वास आणि प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. या पाठींब्यामुळेच प्रभाग क्रमांक 27 मध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन आणि नाशिक पश्चिमचे आमदार मा. सीमाताई महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक निधी आणि आमदार निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे साध्य करण्यास आम्हाला यश मिळाले.
गेल्या कार्यकाळात प्रभागातील जवळपास सर्व महत्त्वाच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. रस्ते विकास, ड्रेनेज दुरुस्ती व नवी लाईन, काँक्रीट रस्ते, प्रभागातील गार्डनचे सुशोभीकरण, अभ्यासिका सुविधा, स्टेडियम संदर्भातील प्रश्न, विविध स्थानिक अडचणी आणि सिडकोवासच्या प्रमुख समस्या अशा अनेक क्षेत्रांमध्ये सुसंगतपणे काम केले. माझ्या प्रभागामध्ये मोठा भाग हा स्लम व मध्यमवर्गीय नागरिकांचा असल्याने कोरोना काळात त्यांच्या अडचणींची प्रखर जाणीव होती. त्या कठीण काळात आमच्या कार्यालयामधून निरंतर अन्नदान, औषधे, आवश्यक गोळ्या आणि गरजूंना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची सेवा आम्ही कोणतीही तडजोड न करता सातत्याने सुरु ठेवली. ही सेवा हे केवळ कर्तव्य नव्हते, तर माझ्या प्रभागाच्या प्रत्येक नागरिकाप्रती असलेले नाते अधिक दृढ करणारे होते.
पाथर्डी फाटा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याची उभारणी करण्यात मी मोलाची भूमिका पार पाडली. हा प्रकल्प प्रभागाच्या सामाजिक-सांस्कृतिक भानाचा आणि प्रगतीशील विचारांचा द्योतक ठरला. अंबड गावातील महानगरपालिकेची शाळा स्मार्ट शाळा म्हणून उभारण्याचा मान आम्हाला मिळाला. तीन मजली भव्य इमारतीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे शिक्षणाचे वातावरण निर्माण झाले, ज्याचा लाभ हजारो मुलांना दीर्घकाळ मिळणार आहे.दत्तनगर परिसरातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे ड्रेनेज आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा. या दोन्ही समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या. आम्ही कुठलीही काटकसर न करता विहित निधीच्या योग्य वापरातून शुद्ध पाणी पुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था या दोन्ही गोष्टी प्रभावीपणे पूर्ण केल्या. आज या क्षेत्रातील रहिवासी निश्चिंतपणे दैनंदिन जीवन जगत आहेत याचा आम्हाला समाधान आहे. ही सर्व कामे प्रभागातील नागरिकांच्या सततच्या सहकार्यामुळेच शक्य झाली. आपल्या पाठिंब्यामुळेच प्रभागामध्ये विकासाची गंगा वाहू शकली.
प्रभाग महिला राखीव झाल्यामुळे मी स्वतः माघार घेत असून माझ्या कार्याचा पुढील टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मी माझी पत्नी सौ. प्रियंकाताई दोंदे यांना आपल्या सेवेसाठी पुढे करत आहे. प्रियंका या साध्या, प्रामाणिक, कष्टाळू आणि समाजकार्याशी निष्ठेने बांधिल असलेल्या महिला आहेत. महिलांचे प्रश्न, वंचित घटकांच्या अडचणी, तरुणांचे स्वप्न व संधी, उद्योजकतेची गरज, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि महिला भगिनींचे विशिष्ट प्रश्न या सर्वांबाबत त्या संवेदनशील असून प्रभावीपणे काम करण्यास कटिबद्ध आहेत.
आगामी काळात प्रभागासाठीचे आमचे व्हिजन सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर आधारित आहे.
सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक वॉर्ड उभारणे
महिलांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविणे
तरुणांसाठी क्रीडा व करिअर मार्गदर्शन सुविधा निर्माण करणे
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व सुरक्षा योजना बळकट करणे
अनुसूचित जाती घटकांसाठी विशेष विकास कार्यक्रम राबविणे
प्रभागातील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून नवे प्रकल्प उभारणे हे आमचे ठोस ध्येय आहे.
गटारी- ड्रेनेज समस्या सुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारणी
नागरिकांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा
प्रभागातील गार्डनचे सुशोभीकरण, ग्रीन जिमची निर्मिती
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ध्यानकेंद्र
प्रभागातील शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळे
गेल्या पाच वर्षांत आम्ही तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यानंतरही आम्ही सतत तुमच्या संपर्कात राहून तुमच्या कामांसाठी धावपळ केली. कारण प्रभागाच्या विकासापेक्षा आमच्यासाठी दुसरे महत्त्वाचे काहीही नव्हते आणि नाही.
जसा अपार आशीर्वाद आपण मला दिला, तसाच प्रेमाचा आणि विश्वासाचा आशीर्वाद सौ. प्रियंकाताई दोंदे यांना द्यावा ही नम्र विनंती करतो. आपला पाठिंबा मिळाल्यास प्रभागाचा विकास वेगाने, दिशादर्शकपणे आणि संपूर्ण प्रामाणिकतेने पुढे सुरू राहील, याची मी आपल्याला खात्री देतो.
आपला विश्वासू,
राकेश भाऊ दोंदे
माजी नगरसेवक
सौ. प्रियंकालाई राकेश दोंदे
सामाजिक कार्यकर्त्या
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 27 (अ)

































































































































































