इंजि. प्रविण विष्णुपंत नागरे (सर)

नाव: इंजि. प्रविण विष्णुपंत नागरे (सर)
बी.ई. (कंप्युटर), एम.ई. (कंप्युटर), पी.एच.डी. (Pursuing)
विभाग अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, सातपूर अध्यक्ष – गुरुशिष्य समिती ज्योती जन्मोत्सव, सातपूर
मतदारसंघ: प्रभाग क्र. १०
रहिवास: गीताई निवास, त्रंबकरोड, पिंपळगाव बहुला
अनुभव: सामाजिक / व्यावसायिक क्षेत्रातील १० वर्षांचा अनुभव
संपर्क क्रमांक: 9881809927
इमेल : nagarepravin1189@gmail.com

प्रिय प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांनो,
आपल्या विश्वासाच्या बळावर आणि लोकसेवेच्या मूल्यांवर चालत मी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व नागरी क्षेत्रात कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, युवक-महिला सक्षमीकरण व नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे हेच माझ्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहेत.
आपल्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण, शाश्वत व समतोल विकास घडविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.

“आपल्या अपेक्षा – आमचे ध्येय | सुशासन – विकास – सामाजिक सेवा”.

Description

प्रिय प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकहो,

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा व महाराष्ट्र राज्याचे भाग्य विधाते आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रेरणेने राजकारण व समाजकारण करत असतांना सैदव जनसामान्यांसाठी, शोषित व पिढीतांसाठी काम करण्याची उर्जा मिळत असते. प्रदेशाध्यक्ष मा. मंत्री शशिकांत शिंदे साहेब, युवकांचे सक्षम नेतृत्व आमदार रोहित दादा पवार व नाशिक शहर जिल्हाध्यक्ष श्री. गजानन नाना शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मी सामाजिक आणि लोककल्याणाच्या कार्यात सातत्याने योगदान दिले आहे. लोकांचे प्रश्न, त्यांची अडचण आणि त्यावरील योग्य मार्ग काढणे हाच माझा ध्यास राहिला आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पिंपळगाव बहुला येथे झाले असून, उच्च माध्यमिक शिक्षण हे के टी एच एम कॉलेज नाशिक येथे झालेले आहे. कम्प्युटर विभागातील पदवी व मास्टर डिग्री मी येवला येथून पूर्ण केलेली आहे. सध्या मी संदीप युनिव्हर्सिटी मध्ये कम्प्युटर विभागात पीएचडी करत आहे. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असल्याकारणाने सातपूर विभागातील सर्व सामाजिक कार्यक्रमांमध्ये माझा सक्रीय सहभाग आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना व पालकांना सहकार्य व्हावे या हेतूने मी मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरी न करता प्राध्यापक म्हणून लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक येथे कार्यरत आहे. पक्षाची विचारधारा आणि विकासाचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले आहे.

माझ्या कुटुंबाची समाजकार्यातील परंपरा आजोबा स्वर्गीय पैलवान सुकदेव नागरे हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. त्याचबरोबर नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघटनेवर ही त्यांनी काम बघितले होते. पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापती पदावर असतांना त्यांनी गावात एक भव्य वास्तूची निर्मिती केलेली आहे. पिंपळगाव बहुला गावाच्या राजकिय व सामाजिक जडनघडनीत त्यांचे महत्वाचे योगदान राहिलेले आहे. माझ्या आईचे वडील स्वर्गीय पैलवान काशिनाथ बोडके यांनी सलग २५ वर्ष ढकांबे गावचे सरपंच पद भूषवले होते. नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व नामवंत पैलवान यांचे आमच्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वडील श्री. विष्णुपंत सुकदेव नागरे हे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक व पिंपळगाव बहुला एज्युकेशन सोसायटी या संस्थेवर संचालक म्हणून काम बघतात. माझे काका श्री. विनायक सुकदेव नागरे हे पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती आहेत. माझा लहान भाऊ पैलवान पंकज विष्णुपंत नागरे हा उत्कृष्ट कुस्तीपटू असून माझ्यासोबत समाजकारणात देखील सक्रिय आहे

कौटुंबिक पार्श्वभूमी

मी सामाजिक व शैक्षणिक कार्याची परंपरा लाभलेल्या कुटुंबातून आलो आहे. माझ्या कुटुंबाने शेती, शिक्षण, सामाजिक संस्था व सहकार क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. या संस्कारांमुळे समाजहित, सेवा व जबाबदारीची जाणीव माझ्या कार्यात सदैव केंद्रस्थानी राहिली आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी

बी.ई. (कॉम्प्युटर)
एम.ई. (कॉम्प्युटर)
पीएच.डी. (सुरू)
सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व करिअर विकासासाठी मार्गदर्शन करीत आहे.

राजकीय वाटचाल

मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी निष्ठावंत राहून, सामान्य माणसाच्या वेदना, आशा आणि स्वप्ने मनात ठेवून माझी राजकीय वाटचाल करीत आहे. लोकशाही हे केवळ एक शासनपद्धती नसून, ती सामान्य जनतेच्या आवाजाची खरी ताकद आहे, या विश्वासातून मी कार्य करतो. सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकास हे शब्दापुरते न ठेवता, ते प्रत्यक्षात उतरवण्याचा माझा निर्धार आहे.

शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान, कामगारांच्या श्रमांचे मूल्य, युवकांच्या स्वप्नांना दिशा आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे, हेच माझ्या राजकारणाचे खरे केंद्र आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून मोर्चे काढणे, प्रशासनाच्या दारात ठामपणे निवेदने सादर करणे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे—हीच माझी राजकीय भूमिका आहे.

सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी मी राजकारणात आहे. लोकांच्या विश्वासाशी प्रतारणा होऊ न देता, सत्य, धैर्य आणि पारदर्शकतेच्या बळावर मी लढत राहीन. सामान्य माणसाचा आवाज सत्तेच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे, हीच माझी ओळख आणि माझी राजकीय वाटचाल आहे.

सामाजिक कार्य आणि उपक्रम

माझा सामाजिक आणि जनकल्याणाचा कार्यप्रवाह

1. कोरोना काळातील मदत:

  • महामारीच्या कठीण काळात गरजू नागरिकांसाठी अन्नधान्य, औषधे, आवश्यक साहित्य पुरवठा केला.
  • थेट मदतीच्या माध्यमातून संकटग्रस्त लोकांना आधार दिला.
  • हे फक्त कर्तव्य नव्हे, तर माझ्या सामाजिक जाणिवेचा भाग आहे.

2. आरोग्य सेवा:

  • मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रतपासणी आणि रक्तदान शिबिरे नियमितपणे आयोजित केली.
  • प्रत्येक नागरिकाला मूलभूत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

3. शिक्षण आणि विद्यार्थी:

  • गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप केले.
  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाला प्रेरणा दिली.
  • शिक्षणात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, हीच या उपक्रमाची भूमिका होती.

4. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संस्थांचे सन्मान:

  • महिला व ज्येष्ठ नागरिकांचे योगदान मानले आणि त्यांचा सन्मान केला.
  • सामाजिक संस्थांच्या कार्याचे योग्य सन्मान आणि त्यांच्या समस्या ऐकल्या.
  • विविध सन्मान सोहळे व संवादात्मक उपक्रम राबविले.

5. सांस्कृतिक उपक्रम:

  • शिवजन्मोत्सव, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले.
  • यामध्ये सामाजिक सलोखा, युवकांचा सहभाग व सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करण्यावर भर.

6. लोकशाही प्रक्रियेतील मदत:

  • नागरिकांना शासकीय प्रक्रियेत त्रास होऊ नये, म्हणून आधारकार्ड नोंदणी/दुरुस्ती, विविध दाखले, मतदार यादी दुरुस्ती यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली.
  • प्रत्येक नागरिकाचा लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग सुनिश्चित केला.

7. सेवेचा दृष्टिकोन:

  • सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी राजकारण केले.
  • सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून, गरज पडल्यास प्रशासनाशी संघर्ष केला.
  • शेवटच्या माणसाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा केला.
  • हेच माझे राजकीय आदर्श आणि ओळख आहे.
  • हेच माझे राजकीय आदर्श आणि ओळख आहे.
Nagare Sir

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नागरिकांचा ठाम आवाज

0
सातपूर परिसरातील खड्डेमुक्त रस्त्यांच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी रंगोली काढत पालिकेविरोधात आंदोलन केले. सातपूर–त्र्यंबकेश्वर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने नागरिकांना दररोज…
Nagare Sir

युवकांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व

0
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक १० मधील युवकांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व म्हणून इंजिनिअर प्रविण नागरे पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
Nagare Sir

प्रभाग क्र. १० मधील समस्यांकडे लक्ष वेधणारे नेतृत्व

0
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक १० मधील विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सक्रिय नेतृत्व म्हणून इंजि.…

उद्दिष्टे आणि दृष्टीकोन

  • पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासन हीच माझी ओळख आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक निर्णयात उत्तरदायित्व आणि प्रामाणिकपणा जपला जाईल.
  • युवकांना दर्जेदार शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे माझे प्राधान्य आहे. कोणत्याही तरुणाचे स्वप्न संधीअभावी अपूर्ण राहू नये, यासाठी मी कटिबद्ध आहे.
  • महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर, सुरक्षित आणि सन्मानाची वागणूक मिळेल अशी व्यवस्था उभी करणे, हा माझा निर्धार आहे.
  • स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्रभाग निर्माण करून मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्यावर भर दिला जाईल.
  • पर्यावरणपूरक विकास साधत, नागरिकांच्या थेट सहभागातून टिकाऊ व समतोल प्रगती घडवून आणणे, हीच माझी विकासदृष्टी आहे.

स्थानिक समस्या आणि उपाययोजना

प्रमुख समस्या

  • रस्त्यांची दुरवस्था व अपुरी देखभाल

  • पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्थेतील अडचणी

  • स्वच्छता व आरोग्य सुविधांची कमतरता

  • वाहतूक कोंडी व अपुरी प्रकाशव्यवस्था

आमची उपाययोजना

  • महापालिका व संबंधित विभागांकडे सातत्यपूर्ण व ठाम पाठपुरावा

  • नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व सक्रिय संपर्क कार्यालय

  • कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी व गुणवत्तेवर कडक लक्ष

  • लोकसहभागातून, पारदर्शकतेने व संवादातून समस्या निराकरण

फोटो गॅलरी

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व पक्षीय उपक्रमांतील कार्याचे छायाचित्र संकलन.

Nagare Sir (36)

Nagare Sir (35)

Nagare Sir (34)

Nagare Sir (33)

Nagare Sir (32)

Nagare Sir (31)

Nagare Sir (30)

Nagare Sir (29)

Nagare Sir (28)

Nagare Sir (27)

Nagare Sir (26)

Nagare Sir (25)

Nagare Sir (24)

Nagare Sir (23)

Nagare Sir (22)

Nagare Sir (21)

Nagare Sir (20)

Nagare Sir (19)

Nagare Sir (18)

Nagare Sir (17)

Nagare Sir (16)

Nagare Sir (15)

Nagare Sir (14)

Nagare Sir (13)

Nagare Sir (12)

Nagare Sir (11)

Nagare Sir (10)

Nagare Sir (9)

Nagare Sir (8)

Nagare Sir (7)

Nagare Sir (6)

Nagare Sir (5)

Nagare Sir (4)

Nagare Sir (3)

Nagare Sir (2)

Nagare Sir (1)

सोशल मीडिया दुवे

नागरिकांशी थेट संवाद, उपक्रमांची माहिती व अभिप्रायासाठी अधिकृत सोशल मीडिया माध्यमांचा वापर.

Instagram
WhatsApp
YouTube

संपर्क

जनसंपर्क कार्यालय – सातपूर, नाशिक
मोबाईल : 98818 09927

Menu