Description
आदरणीय मतदार बंधु-भगिणी व मातांनो,
मी अँड. अतुल सुकदेव सानप येत्या नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुक २०२५-२६ मध्ये होत असलेल्या निवडणुक प्रक्रियेत नगरसेवक प्रदाकरीता उमेदवारी करण्यास इच्छुक आहे. माझे वडिल श्री. सुकदेव काशिनाथ सानप हे VIP या कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते. मी आपल्याच परिसरात राहुन अतिशय गरीब परिस्थितीत LLB पर्यंतचे शिक्षण घेऊन वकील झालो. मी वकीली व्यवसाय करीत असताना अनेक गरीब व गरजू नागरीकांना त्यांच्या कायदेशिर अडचणीत त्यांना मोफत सल्ला देवून योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे. मी गेल्या २० वर्षांपासून वकीली क्षेत्राबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे.
मी आपल्याच परिसरात लहानचा मोठा झालेला असल्याने मला आपल्या परिसरातील अडी – अडचणींची व समस्यांची जाण आहे. सध्या आपल्या प्रभागातील नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय महात्वाचा बनत चाललेला आहे. सध्या आपल्या परिसरात गुंडगिरी, अंमली पदार्थांची विक्री व सेवन आणि इतर अनेक अवैध धंदे सुरु आहेत. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे आपली भावी पिढी शिक्षण व कामधंदयाकडे दुर्लक्ष करून गुंडगिरीकडे वळत आहे. यास आपल्याच प्रभागातील काही गुंड प्रवृत्तीची लोक प्रतिनिधी जबाबदार आहेत. अशा स्वार्थी व भ्रष्ट लोकप्रतिनिधींनी आपल्या स्वतःच्या मुलांना शिकवून मोठे केले परंतु प्रभागातील व कार्यकर्त्यांच्या मुलांना गुंडगिरी व व्यसनाच्या खोल दरीत लोटले. यांनी सुशिक्षित व शिकलेल्या इंजिनिअर मुलांच्या हातात काम देण्या ऐवजी बंदुका दिल्या. सदर भ्रष्ट लोक प्रतिनिधींनी केवळ स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला.
येत्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ३०-३० फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्या, सलीम कुत्ता सारख्या दहशतवादयाशी संबंध असणाऱ्या मे. कोर्टाने शिक्षा ठोठावलेल्या, गुंडगिरीच्या माध्यमातुन दहशत पसरविणाऱ्या व भ्रष्टाचार करणाऱ्या उमेदवारांना हिच खरी वेळ आहे धडा शिकविण्याची व योग्य, सुशिक्षित उमेदवारास मतदान करून आपल्या प्रभागाचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची. याकरीता मला आपले पाठबळ, आशिर्वाद, मार्गदर्शन व सहकार्य मिळावे. हि नम्र विनंती.
आपला नम्र
अँड. श्री. अतुल सुकदेव सानप
(अॅडव्होकेट व नोटरी भारत सरकार)
9822962210







