प्रभाग ८

प्रभागाचे नाव: आनंदवली गंगापूर, काळे नगर
लोकसंख्या: ४४,४०१
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ७,२६५
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ४,२६०
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
नरसिंहनगर, शंकरनगर, सदगुरु नगर, खांदवे नगर
सोमेश्वर कॉलनी, भवर मळा, संत कबीर नगर, काळे नगर
सावरकर नगर, आनंदवली परिसर, आनंदवली गाव, गंगापूर गाव
सीमा:
उत्तर: गंगापूर गोवर्धन मनपा हद्दीपासून गोदावरी नदीच्या उजव्या तिराने पूर्वेकडे येऊन दक्षिणेकडील भाग घेऊन पुढे गोदावरी नदीकाठाने उजव्या तिरावरील भगूरकर मळयापर्यंत.
पूर्व: गोदावरी नदीलगत उजव्या किनाऱ्यावरील भगूरकर मळयापासून दक्षिणेकडील गार्गी हाऊस व पश्चिमेकडील परिसर घेऊन नंतर डी.पी.रस्ता ओलांडून तिरुपती टाऊन चौकातून आकाशवाणी टॉवरपर्यंत. तेथून पश्चिमेकडील आकाशवाणी कर्मचारी वसाहत ते सक्सेना बंगलो बंगल्यापर्यंत. तेथून दक्षिणेकडे जाऊन लोटस् कोर्ट, मंडलिक प्राईड, करी लीव्हज् हॉटेल घेऊन जेहान सर्कलपर्यंत. तेथून मुख्य रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन काका-का धाबा हॉटेल, रामनगर परिसर घेऊन गंगापूर रोडवरील भोसला स्कूल गेटचे पश्चिम हद्दीपर्यंत.
दक्षिण: वनविहार कॉलनीतील सातपूर-आनंदवली शीवेवरील आई रेसिडेन्सीपासून वनविहार कॉलनीच्या दक्षिण हद्दीने व्दारका निवास घेऊन साहील पार्क पर्यंत. तेथून पश्चिमेकडे कामगार नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन पाईपलाईन रोडपर्यंत. तेथून उत्तरेकडे गणेश नगर पावेतो. तेथून पश्चिमेकडे जाऊन एमआयडीसी हद्दीने गणेशनगर, सदगुरु नगर, सोमेश्वर कॉलनी तेथून भवर मळा परिसर घेऊन ध्रुव नगर मागील सोमेश्वर नाल्याने उजवा तट कालव्यापर्यंत. तेथून उजव्या तट कालव्याच्या हद्दीने पश्चिमेकडे जाऊन हनुमान नगर परिसर घेऊन सावरगाव रोड मनपा हद्दीपर्यंत.
पश्चिम: सावरगाव रोड मनपा हद्दीवरील नाशिक उजवा तट कालव्यापासून शीव रस्त्याने उत्तरेकडे जाऊन गंगापूर रस्त्यापर्यंत. तेथून गंगापूर रस्ता ओलांडून गंगापूर-गोवर्धन शीवेने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेऊन गंगापूर-गोवर्धन शीवेने गोदावरी नदीपर्यंत

उमेदवार

Menu