प्रभाग ७

प्रभागाचे नाव: गंगापूर रोड परिसर, अशोकस्तंभ परिसर
लोकसंख्या: ४४,३८२
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): २,८११
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,४६९
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
प्रसाद मंगल कार्यालय , आयचित नगर, थत्ते नगर, राठी अमराई
केटीएचएम कॉलेज परिसर , मामा मुंगी कार्यालय, मल्हार खान स्लम, घारपुरे घाट
रुंग्ठा हायस्कूल परिसर, गोळे कॉलनी , पोलीस हेड क्वॉर्टर, पंडीत कॉलनी
पाटील लेन परिसर, डॉन बॉस्को स्कूल परिसर, डिसूझा कॉलनी
सीमा:
उत्तर: गोदावरी नदीच्या उजव्या तीरावरील वृंदावन अपार्टमेंट समोरील रस्त्याचे नदीलगतचे हद्दीपासून पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन शासनाची नर्सरी, सुयोजीत गार्डन, गंगापूर पंपींग स्टेशन, सोमवंशी मळा (गुरूदत्त नगर), जोशी वाडा झोपडपट्टी, केटीएचएम कॉलेज, मल्हार खान स्लम घेऊन हनुमान घाट, घारपुरे घाट, सिध्देश्वर मंदिर, फणिबाबा दर्गा घेऊन नदी काठावरील गंगावाडीतील तुळजा भवानी मंदिरापर्यंत.
पूर्व: गोदावरी नदीच्या तिरावरील गंगावाडीतील तुळजा भवानी मंदिरापासून दक्षिणेकडील डांगर रस्त्याने जाऊन पश्चिमेकडील भाग व निमाणी मंगल कार्यालय घेऊन निमाणी चाळ, हेमलता थिएटर घेऊन पश्चिमेकडील रस्त्याने शनी लेन पर्यंत. तेथून शनी लेनने पश्चिमेकडील गजानन ड्राय क्लिनर्स ते मसाला मंत्र पाणीपुरी पावेतोचा भाग घेऊन तेथून रस्ता ओलांडून महाराष्ट्र पुस्तक भांडार घेऊन देवधर लेनने पश्चिमेकडील घर क्र. ४७५ पासूनचा भाग घेऊन तेथून पश्चिमेकडील घनकर लेनच्या रस्त्याने जाऊन भसे वाडा घेऊन तेथून दक्षिणेकडे सुगंधा क्लिनीक, कमल इंडस्ट्रीज घेऊन व मारुती मंदिर परिसर घेऊन अशोकस्तंभ पावेतो.
दक्षिण: अशोकस्तंभ पासून जुना आग्रारोडने बाबुजी अॅटोमोबाईल्स, विकास सर्कल थिएटर, गोळे कॉलनी परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय व पश्चिमेकडील भाग घेऊन जुने सि.बी.एस. पर्यंत. जुने सि.बी.एस. पासून शरणपूररोडने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग व पोलीस परेड ग्राऊंड, मनोरथ हॉटेल, सुयोजित ट्रेड सेंटर, जोंधळे कॉम्प्लेक्स, सुमती सोसायटी, बीएसएनएल कार्यालय घेऊन कॅनडा सिग्नलवरील अॅगोरा टॉवर पर्यंत. तेथून मुख्य रस्त्याने उत्तरेकडे जाऊन पुर्वेकडील भाग घेऊन कॉलेज रोडने पश्चिमेकडे जाऊन अहिरराव फोटो स्टुडीओ पासून उत्तरेकडील भाग घेऊन डॉन बॉस्को स्कूल परिसर घेऊन डिसूझा कॉलनी परिसर घेऊन लोकमत सर्कल जवळील ऋषिकेश-अ सोसायटीपर्यंत.
पश्चिम: कॉलेज रोडवरील लोकमत सर्कल येथील ऋषिकेश-अ सोसायटीपासून जेहान सर्कल रस्त्याने पूर्वेकडील परिसर घेऊन व तेथून नरसिंग नगर चौकातील चंद्रविर प्लाझा सोसायटी पावेतो. तेथून पूर्वेकडील रस्त्याने दक्षिणेकडील श्रमिक कॉलनी परिसर घेऊन आकाशवाणी चौकापर्यंत. पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने पूर्वेकडील नक्षत्र कॉलनी, तिरुपती टाऊन, अरिहंत हॉस्पीलटल डाऊन टाऊन घेवून गोदावरी नदी काठावरील चैतन्य नगरमधील वृंदावन अपार्टमेंट घेऊन रस्त्याने गोदावरी नदी तिरापर्यंत

उमेदवार

Menu