प्रभागाचे नाव: पाथर्डी, राणे नगर, दाढेगाव, पाथर्डी फाटा.
लोकसंख्या: ४४,९६०
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ६,१३६
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ३,४७३
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
गणेश कॉलनी, नगरकर लेन, इच्छापुरी चौक, राणे नगर, सिमेन्स कॉलनी.
साई पॅलेस हॉटेलच्या पूर्वेकडील भाग, अमोल नयनतारा गोल्ड, हॉटेल सेवन हेवन पूर्वेकडील भाग.
ज्ञानेश्वर नगर, समर्थ नगर, वडाळा पाथर्डीरोड.
गुरु गोविंदसिंग कॉलेज समोरील भाग, पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावठाणाच्या पाथर्डी रोडच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील भाग.
प्रशांत नगर, अयोध्या कॉलनी, नरहरी नगर, दामोदर नगर.
दादासाहेब फाळके स्मारक व लगतचा भाग, पाथर्डी गाव, पाथर्डी दाढेगाव रोडच्या पूर्व-पश्चिम भाग, दाढेगाव.
पिंपळगाव खांब रोडच्या पश्चिमेकडील भाग.
सीमा:
उत्तर: मुंबई आग्रा रोड रा.म.क्र. ३ राणे नगर रस्त्याने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन राणेनगर रोडवरील निर्वाणा आर्केडपर्यंत. तेथून उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन चिरंजीव हॉस्पीटलपर्यंत. तेथून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन श्री तिरुमल ईलाईटपर्यंत. तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन राणेनगररोड पर्यत. तेथून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन दया क्लिनिक व फिजिओ केअर पर्यंत. तेथून दक्षिणेकडे डे-केअर स्कुलपर्यंत. तेथून दक्षिणेकडील भाग घेऊन नाशिक पाथर्डी रोड श्री गजानन टॉवर पर्यंत.
पूर्व: श्री गजानन टॉवरपासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील सिमेंन्स कॉलनी, सराफ लॉन्स परिसर घेऊन पाथर्डी शिवरोडपर्यंत. वडाळा-पाथर्डी रोडवरील पाथर्डी शिवरोड ते वडाळा-पाथर्डी रस्ता जंक्शनपासून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन मिलिटरी हद्दीपर्यंत. मिलिटरी हद्दीने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन पिंपळगाव खांब व वडनेर शिवरोडपर्यंत.
दक्षिण: वडनेर पिंपळगाव खांब शिवरोडने मिलिटरी हद्दीपासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन ३० मी. रुंद पाथर्डी रस्त्यापर्यंत. ३० मी. रुंद पाथर्डी रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन पिंपळगाव खांब रोडपर्यंत. पाथर्डी व पिंपळगाव खांब रोड चौकापासून दक्षिणेकडे पिंपळगाव खांब रोडने पश्चिमेकडील भाग घेऊन वालदेवी नदीपर्यंत. पिंपळगाव खांब रोडने पिंपळगाव खांब गावठाण परिसर सोडून पूर्व दिशेचा भाग घेऊन तुळसाई निवासापर्यंत. तुळसाई निवासापासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन पिंपळगाव खांब व वडनेर शीव रोडच्या मनपा हद्दीवरील टोकापर्यंत. महानगरपालिका हद्दीवरील पिंपळगाव खांब (स.नं.९०) शीवेच्या टोकापासून दक्षिणेकडील मनपा हद्दीपर्यंत.
पश्चिम: नाशिक मनपा पश्चिमेकडील हद्दीने नाशिक मुंबई हायवेपर्यंत. नाशिक-मुंबई हायवेने उत्तर-पूर्व दिशेला पूर्वेकडील भाग घेऊन सर्व्हस रोडने राणेनगरच्या १८ मी. रुंद डी.पी. रोडपर्यंत.
प्रभाग ३१









