प्रभागाचे नाव: डीजीपी नगर क्र. २, वृंदावन नगर, महालक्ष्मी नगर, मुरारी नगर, कार्तिकेय नगर, उपेंद्र नगर, वनश्री कॉलनी, कर्डीले मळा.
लोकसंख्या: ५१,८९६
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ४,४८८
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,४१२
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
डीजीपी नगर क्र. २, वृंदावन नगर, महालक्ष्मी नगर, मुरारी नगर
कार्तिकेय नगर, उपेंद्र नगर, वनश्री कॉलनी, कर्डीले मळा
शुभम पार्क, अंबिका नगर, प्रसन्न नगर
बाल मुक्तांगण शाळा, फडोळ मळा परिसर
सीमा:
उत्तर: सातपूर शीव नाल्यालगत नागेश्वर मंदिर येथून पूर्व दिशेने नागेश्वर मंदिर घेऊन १८ मीटर डी.पी. रस्त्याने पूर्व दिशेला दक्षिणेकडील पुरुषोत्तम नगर भाग घेऊन आयटीआय पूल ते डीजीपी नगर १८ मी. डी. पी. रस्ता ओलांडून १८ मी. डी. पी. रस्त्याने दक्षिणेकडील वावरे नगर भाग घेऊन नाल्यापर्यंत (निशांत सोसायटी). शिवशक्ती चौक ते डी.जी.पी. नगर क्र. २ नाल्यालगत निशांत सोसायटी पासून नाल्याने दक्षिण दिशेने पश्चिमेकडील वावरे नगर, विठ्ठल नगर भाग घेऊन, कामटवाडे स्मशानभूमी पर्यंत.
पूर्व: त्रिमुर्ती चौक ते शुभम पार्क १८ मी. डी.पी. रस्त्याने यश प्लाझा पासून पाथर्डी-अंबड गाव रस्त्याच्या दक्षिण दिशेने पश्चिमेकडील अंबिका नगर, कमल नगर, इफको कॉलनी, रामेश्वर नगर, शुभम पार्क, गणेश कॉलनी, महाजन नगर भाग घेऊन श्रध्दा अपार्टमेंट पर्यंत. तेथून डावीकडे (पूर्वेकडे) वळून श्रध्दा अपार्टमेंट सोडून अमीबंसरी गार्डन अपार्टमेंट घेऊन पूर्व दिशेने दक्षिणेकडील भाग घेऊन घर नं. N-५२/SE/१/१७/१ पर्यंत. तेथून घर नं. N-५२/SE/१/१७/१ घेऊन पूर्व दिशेने घर नं. N-५२/SE/१/१८/१ पर्यंत. तेथून उजवीकडे (दक्षिणेकडे) वळून घर नं. N-५२/SE-१/१८/१ घेऊन दक्षिण दिशेने राजे संभाजी स्टेडीयमकडे जाणाऱ्या रस्त्याने पश्चिमेकडील भाग घेऊन सेंट लॉरेन्स स्कूल व म.न.पा. महिला मार्केट संकुल पर्यंत.
दक्षिण: सेंट लॉरेन्स व म.न.पा. महिला मार्केट येथून बुरकुले लॉन्सकडे (पश्चिमेकडे) जाणऱ्या रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन त्रिमुर्ती चौक ते अंबड-पाथर्डी रस्त्याला जोडणाऱ्या १८ मी. डी.पी. रस्त्यावरील हॉटेल एक्सलन्सी पर्यंत. तेथून हॉटेल एक्सलन्सी सोडून श्रध्दा अपार्टमेंट घेऊन उजवीकडे (उत्तरेकडे) वळून १८ मी. डी.पी. रस्त्याने उत्तर दिशेला डाव्या बाजूकडील हनुमान मंदिरापर्यंत.
पुढील सीमा हनुमान मंदिर व मंगलदिप अपार्टमेंट यांच्यामधून पश्चिमेकडे जाणाऱ्या उपेंद्र नगर रस्त्याने पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन उजव्या बाजूकडील श्री. पाटील यांचे घर व विश्वकर्मा फर्निचर पर्यंत. तेथून डावीकडे (दक्षिणेकडे) वळून श्री. पाटील यांचे घर सोडून व विश्वकर्मा फर्निचर दुकान घेऊन दक्षिण दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन श्री. कोळी यांचे घरापर्यंत. कोळी यांचे घर घेऊन उजवीकडे (पश्चिमेकडे) वळून साईग्राम कॉलनी व उपेंद्र नगर यांच्या हद्दीने पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन श्री. कुलकर्णी यांचे घरापर्यंत.
पुढील सीमा श्री. कुलकर्णी यांचे घर घेऊन मनपा ओपन स्पेस सोडून व श्री. कावळे यांचे घर घेऊन उपेंद्र नगर रस्त्यापर्यंत. डावीकडे (पश्चिमेकडे) वळून श्री. पाटील यांचे घरापर्यंत. श्री. पाटील यांचे घर घेऊन उजवीकडे (उत्तरेकडे) वळून कॉलनी रस्त्यापर्यंत. श्री. दाणी यांचे घर घेऊन कॉलनी रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन दक्षिणोत्तर नाल्यापर्यंत. नाल्यालगत डावीकडे (दक्षिणेकडे) वळून पूर्वेकडील भाग्योदय रोहाऊस सोडून भाग्योदय रोहाऊसच्या दक्षिण बाजूपर्यंत. पश्चिम दिशेला दक्षिणेकडील गॅरेज सोडून व उत्तरेकडील शेती व प्रसन्न नगर भाग घेऊन श्री समर्थ व कन्हैय्या व्हीला पर्यंत.
पश्चिम: माऊली फ्लोअर मिल घेऊन उजवीकडे (उत्तरेकडे) वळुन पूर्वेकडील भाग घेऊन व पश्चिमेकडील साई श्रध्दा रोहाऊस सोडून साईश्रध्दा रोहाऊसला वळसा घालून पश्चिम दिशेने उत्तरेकडील द कम्फर्ट झोन घेऊन अंबडगाव ते डीजीपी नगर क्र. २ च्या १८ मी. डी.पी. रोडपर्यंत. तेथून उजवीकडे (उत्तरेकडे) वळून चाँदशावली दर्गा घेऊन उत्तर दिशेने अंबड एम.आय.डी.सी. हद्दीपर्यंत. अंबड एमआयडीसी हद्दीने पश्चिमेकडे जाऊन डी.जी.पी.नगर ते अंबड एम.आय.डी.सी. १८ मी. डी.पी. रस्त्यापर्यंत. १८ मी. डी.पी. रस्ता ओलांडून उजवीकडे वळून अंबड एमआयडीसी हद्दीने उत्तरेकडे जाऊन नवनाथ किराणा पर्यंत.
पुढील सीमा नवनाथ किराणा घेऊन पश्चिमेकडे श्री. रामकृष्ण दातीर यांचे पक्के बांधकाम दुमजली बांधकाम असलेली चाळ घेऊन उजवीकडे (उत्तरेकडे) वळून चाळीला वळसा घालून उजवीकडे (पूर्वेकडे) वळून डावीकडील (उत्तरेकडील) नामदेव दातीर व इतर यांच्या चाळी सोडून पूर्वेकडील भाग घेऊन नवनाथ किराणा पर्यंत. डावीकडे (उत्तरेकडे) वळून नवनाथ किराणा, शिवगौरी किराणा श्री. सुभाष गायधनी यांचे घर, तुळजा भवानी ट्रेडर्स घेऊन डावीकडे (पश्चिमेकडे) वळून पश्चिम दिशेने उत्तरेकडील श्री. संतु पुंजाजी दातीर यांचे गोरक्षनाथ निवास व नवनाथ मंदीर घेऊन दक्षिणेकडील श्री. रामकृष्ण दातीर यांचे घर सोडून पश्चिमेकडे जाऊन दक्षिणेकडील एस.एस. एंटरप्रायझेस सोडून अंबड एमआयडीसी हद्दीपर्यंत. अंबड एमआयडीसी हद्दीने नाल्यापर्यत आणि नाल्याने दक्षिणेकडे वळून एमआयडीसी हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन एक्स्लो जंक्शन ते अंबडगाव ३० मी. डी.पी. रस्त्यापर्यंत. एक्स्लो जंक्शन ते चुंचाळे गाव १८ मी. डी.पी. रस्त्याने हॉटेल पंचरत्न घेऊन हॉटेल पंचरत्न मागील नाल्यावरील पुलापर्यंत. हॉटेल पंचरत्न मागील नाल्यावरील पुलापासून नाल्याने उजवीकडे वळून नाल्याने उत्तर-पूर्व दिशेने सातपूर लिंक रस्ता ओलांडून खान बंगल्याकडे जाणाऱ्या नाल्याने नाल्याचा पूर्वेकडील भाग घेऊन खान बंगल्यापर्यंत. नाल्याने उत्तर दिशेने जाऊन पूर्वेकडील विखे पाटील शाळा, वृंदावन नगर, सिध्दटेक नगर, कार्तिकेय नगर, पुरुषोत्तम कॉलनी भाग घेऊन नागेश्वर मंदिरापर्यंत.
प्रभाग २८







