प्रभागाचे नाव: इंदिरा नगर, भरत नगर, डी.जी.पी. नगर, अशोका मार्ग
लोकसंख्या: ५१,१९१
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ४,९९७
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ४,८००
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
भारत नगर, श्रीराम नगर, विनय नगर
हॅपी होम कॉलनी, अशोका मार्ग, खोडे नगर, गणेश बाबा नगर
सावता माळी रोड, डीजीपी नगर, कमोद नगर, इंदिरा नगर
सीमा:
उत्तर: जुना मुंबई नाका, रा.म.क्र. ३, नासर्डी नदी पुलापासून पूर्वेकडे, दक्षिणेकडील भाग घेऊन नाशिक पुणा रोड पर्यंत.
पूर्व: नाशिक पुणा रोड, नासर्डी नदी पुलापासून नाशिक पुणा रोडने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन डी.जी.पी. नगर बाजूच्या मिलिटरी हद्दीपर्यंत.
दक्षिण: नाशिक पुणा रोड मिलिटरी हद्दीने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन पुढे कॅनॉल रोडने उत्तरेकडील भाग घेऊन नाशिक पाथर्डी रोडवरील साईनाथ चौफुलीपर्यंत. तेथून पाथर्डी रोडने दक्षिणेकडे पेठे नगर रोडने रथचक्र चौकापर्यंत. तेथून उत्तरेकडील भाग घेऊन चार्वाक चौकापर्यंत. चार्वाक चौकापासून गजानन महाराज मंदिराच्या दिशेला समोरील पश्चिम रस्त्यापर्यंत. तेथून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन राधेश्याम बंगल्यापर्यंत. तेथून दक्षिणेकडे डायमंड हाईट इमारतीच्या दक्षिण बाजूने (डायमंड हाईट इमारतीचा समावेश करुन) रा.म.क्र. ३ न्यू ग्रेट पंजाब हॉटेलच्या उत्तरेकडील बाजूपर्यंत.
पश्चिम: डायमंड हाईटस इमारतीपासून रा.म.क्र. ३ ने पूर्वेकडील भाग घेऊन रा.म.क्र. ३ ने जुना मुंबई नाका नासर्डी नदी पुलापर्यंत.
प्रभाग २३







