प्रभागाचे नाव: दुर्गा उद्यान, आनंदनगर, राजवाडा
लोकसंख्या: ४६,७५७
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): १०,६८५
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ९८५
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
दुर्गा उद्यान परिसर, रेल्वे स्टेशन
देवी चौक, मालधक्का रोड, सुभाष रोड
धोंगडे नगर, आनंद नगर, गुलमोहर कॉलनी
फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड परिसर, लिंगायत कॉलनी
देवळाली राजवाडा, जचक नगर
सीमा:
उत्तर: मिलिटरी हद्द, शिवकृपा अपार्टमेंट, वल्लभ बंगल्यापासून दक्षिणेकडील जयभवानी रोडने हरिदर्शन अपार्टमेंट पर्यंत. हरिदर्शन अपार्टमेंट पासून जयभवानी रोडने उत्तरेकडे फर्नांडिसवाडीसह (झोपडपट्टी) वाल्मिक मंदिरापर्यंत. वाल्मिक मंदिरापासून पूर्वेकडील भाग घेऊन दक्षिणेकडील क्षेत्र हिरापन्ना अपार्टमेंट पर्यंत. हिरापन्ना अपार्टमेंट पासून दक्षिणेकडे विशाल बंगल्यापर्यंत.
पूर्व: विशाल बंगल्यापासून दक्षिणेकडील भाग घेऊन मुक्तीधाम महात्मा गांधी रोडपर्यंत. मुक्तीधामपासून उत्तरेकडे महात्मा गांधी रोडने बिटको चौकापर्यंत. बिटको चौकापासून पूर्वेकडील भाग घेऊन दक्षिणेकडील क्षेत्र नाशिक पुणा रोडवरील रेल्वे लाईनपर्यंत. नाशिक-पुणे रोडवरून दक्षिणेकडे रेल्वे लाईनने पश्चिमेकडील भाग घेऊन वालदेवी नदीपर्यंत.
दक्षिण: रेल्वे लाईनपासून वालदेवी नदीने उत्तरेकडील भाग घेऊन पश्चिमेकडे लॅमरोड वालदेवी नदी पुलापर्यंत. वालदेवी नदी पुलावरून महात्मा गांधी रोडने महात्मा गांधी पुतळयापर्यंत. महात्मा गांधी पुतळयापासून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन देवळाली गाव पोलीस चौकीपर्यंत. देवळालीगाव पोलीस चौकीपासून (सुंदरनगर झोपडपट्टी वगळून) हरिकृष्ण अपार्टमेंटपर्यंत. हरिकृष्ण अपार्टमेंटपासून आर्टीलरी सेंटर रोड (खोले चौक) पर्यंत. तेथून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन मिलिटरी हद्द पार्वती अपार्टमेंटपर्यंत.
पश्चिम: पार्वती अपार्टमेंट (आर्टीलरी सेंटर रोड) पासून मिलिटरी हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन शिवकृपा, वल्लभ बंगल्यापर्यंत.
प्रभाग २१











