प्रभाग २

प्रभागाचे नाव: आडगांव, कोणार्क नगर, नांदूर-मानूर, विडी कामगार नगर
लोकसंख्या: ४७,०२७
अनुसूचित जाती (SC): ६,०७४
अनुसूचित जमाती (ST): ४,८७६
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
आडगाव मळे परिसर, एमईटी कॉलेज, ग्रामीण पोलीस वसाहत
आडगाव एमव्हीपी मेडीकल कॉलेज, आडगाव गावठाण परिसर, कोणार्क नगर
जत्रा हॉटेल मागील परिसर, अमृतधाम, विडी कामगार नगर, दुर्गा नगर
नांदूर-मानूर गाव व मळे परिसर
सीमा:
उत्तर: मनपा हद्दीवरील आडगाव गट नं. ११०९ पासून मनपा हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन मनपा हद्दीवरील आडगाव गट नं. १७९४ पर्यंत.
पूर्व: मनपा हद्दीवरील आडगाव गट नं. १७९४ पासून मनपा हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे जाऊन गोदावरी नदीलगत मानूर स.नं. ७४ पर्यंत.
दक्षिण: गोदावरी नदीलगत मानूर स.नं. ७४ पासून गोदावरी नदीच्या हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन कपिला गोदावरी संगमावरील नाशिक स.नं. ३३९ पर्यंत.
पश्चिम: कपिला-गोदावरी संगमावरील नाशिक स.नं. ३३९ पासून वहिवाट रस्त्याने पूर्वेकडील भाग घेऊन छत्रपती संभाजीनगर रोड पर्यंत. छत्रपती संभाजीनगर रस्त्याने पूर्वेकडे जाऊन रामांजेय मंदिर पर्यंत, तेथून पुढे कॉलनी रस्त्याने उत्तरेकडे कॅनॉल घरकुल पर्यंत. तेथून कॅनॉल हद्दीने पुढे पश्चिमेकडे दुर्गा नगर लगतचा भाग घेऊन कपिला नदी हद्दीपर्यंत. तेथून कपिला हद्दीने कोहीनूर इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॉलेज पर्यंत, तेथून पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन आडगाव गट नं. ५६१ धात्रक फाटा टाकी पर्यंत. तेथून पुढे शीव रस्त्याने (म्हसरुळ आडगाव शीव, धात्रक फाटा रस्त्याने) मनपा हद्दीवरील आडगाव गट नं. ११०९ हद्दीपर्यंत.

उमेदवार

Menu