प्रभाग १४

प्रभागाचे नाव: गंजमाळ, महात्मा फुले मार्केट, मोठा राजवाडा, नानावली, शिंगाडा तलाव.
लोकसंख्या: ५१,६१८
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ७,१०४
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,०३९
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
गंजमाळ, कोकणीपुरा, चौकमंडई, मुलतानपुरा, काझीपुरा
वझरेरोड, भोईवाडा, मातंगवाडा, नानावली, रेणुकानगर
नागसेनवाडी, गुरुव्दारा परिसर, फाळकेरोड
सीमा:
उत्तर: खडकाळी चौकापासून पूर्वेकडे जाऊन त्रंबक दरवाजाकडील रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन पुढे डावीकडील खडकाळी मज्जीद जवळील स्टेटस कलेक्शन दुकानापासून उत्तरेकडे पिंपळ चौकापर्यंत. तेथून दक्षिणेकडे डिलक्स कलर सेंटर ते तबरेज पान स्टॉल पर्यंत. तेथून त्रंबक पोलीस चौकी पर्यंत पुढे पूर्वेकडे अब्दुल हमीद चौकापर्यंत (दूध बाजार चौक).
पूर्व: अब्दुल हमीद चौकातून (दूध बाजार चौक) रस्ता ओलांडून पूर्वेकडे पिंजारघाट रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन संत नामदेव पथवरील काझी चौकातील मन्सुरी गादी दुकान घेऊन अदमशहा चौकातील काझी पिठाची गिरणी घेऊन पूर्वेकडे चव्हाटा देवी चौकातील अन्नपुर्णा केटरर्स पावेतो. पुढे चर्मकार लेन रस्त्याने दक्षिणेकडील आझाद चौकातील मुरलीधर सोनार किराना दुकानापावेतो. तेथून पुढे आझाद चौकातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन अपना सलून वारे मंडप कॉन्ट्रॅक्टर घेऊन पुढे शिवाजी चौकातील मारिया मेडीकल पर्यंत. तेथून रस्ता ओलांडून शिवाजी चौकातील स्टायलो मेन्स पार्लर, रुद्राक्ष ज्वेलर्स, विराम वस्ताद तालीम व पूर्वेकडील भाग घेऊन नाशिक अमरधाम घेऊन तेथून गोदावरी नदीच्या उजव्या तिराने कन्नमवार पुलापर्यंत.
दक्षिण: मुंबई आग्रा रस्त्यावरील कन्नमवार पुलापासून सर्व्हस रस्त्याने पश्चिमेकडील भाग व ट्रॅक्टर हाऊस घेऊन महालक्ष्मी चेंबर इमारती पर्यंत. मुंबई-आग्रा महामार्गावरील महालक्ष्मी चेंबरपासून उत्तरेकडील भाग घेऊन व्दारका सर्कलपर्यंत. तेथून सर्व्हस रस्त्याने नागसेनवाडी, रेणुका नगर, एव्हरेस्ट कॉलनी परिसर घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन पावेतो.
पश्चिम: मुंबई नाका पोलीस स्टेशन पासून जुना मुंबई आग्रारोडने पूर्वेकडील भाग घेऊन गडकरी चौकातील स्टींग मोटरपर्यंत. तेथून पूर्वेकडे जाऊन गुरुव्दारा परिसर, मनोहर नगर परिसर घेऊन सारडा सर्कल पावेतो. तेथून पुढे ६० फुटी रस्त्याने सहकार सोसायटी व पूर्व भाग घेऊन गंजमाळ स्टॅण्ड, कोमल कुशन घेऊन सोना शॉपिंग सेंटर पर्यंत. तेथून पूर्वेकडे बोळीने राजू गांगुर्डे यांचे घर घेऊन कादरी हाऊसपर्यंत. तेथून बोळीने पश्चिमेकडे ६० फुटी रस्त्यावरील ओमकार फर्निचरपर्यंत. तेथून उत्तरेकडे खडकाळी चौकापर्यंत.

उमेदवार

Menu