प्रभागाचे नाव: रविवार कारंजा परिसर, नेहरु उद्यान परिसर, शालीमार, जिल्हा परिषद व पंचशिल नगर परिसर
लोकसंख्या: ५२,५६५
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ३,८३४
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,२१३
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
तेलीगल्ली, गंगावाडी, गोरेराम लेन, सराफ बाजार, वकीलवाडी
राजेबहाद्दर हॉस्पीटल, स्टेडीयम कॉम्प्लेक्स, भद्रकाली, जीपीओ
पंचशिल नगर, सर्वोदय नगर, डी. आय.जी. बंगला, तिवंधा, बुधवार पेठ
बडी दर्गा, कुंभारवाडा, काझी गढी, पठाणपुरा
सीमा:
उत्तर: अशोकस्तंभ चौकातील विश्व अपार्टमेंट, उज्वल कान नाक घसा हॉस्पीटल व पॅथालॉजी लॅब पासून घनकर गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याने वकीलवाडी परिसर घेऊन कावेरी संकुल इमारतीपर्यंत. तेथून शांती टॉवर घेऊन शिंदे निवास, घोरपडे निवास, देवधर गल्लीतील मुजूमदार वाडयापर्यंत. तेथून देवधर गल्लीने आंनद पुस्तकालयापर्यंत.
पूर्व: आनंद पुस्तकालयापासून रस्ता ओलांडून शनी गल्लीने पूर्वेकडील घर क्र. ५७५ पावेतोचा भाग घेऊन. तेथून पूर्वेकडील रस्त्याने जाऊन हेमलता टॉकीज चौकाचा रस्ता ओलांडून मनपा सार्वजनिक मुतारी घेऊन अवधूत स्वामी मठ, चांदवडकर वाडा घेऊन उत्तरेकडे डांगर उतार रोडने गोदावरी नदीपर्यंत. व गोदावरी नदीच्या उजव्या तिराने दक्षिणेकडील गंगावाडी, सुंदर नारायण मंदिर, एकमुखी दत्त मंदीर, यशवंतराव महाराज समाधी पटांगण, बालाजी कोट, दत्त कोट, रोकडोबा तालीम, मोदकेश्वर मंदिर, गाडगे महाराज धर्मशाळा घेऊन टाळकुटे पुलाजवळील टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत. टाळकुटेश्वर पुलाजवळील टाळकुटेश्वर मंदीरापासून दक्षिणेकडे अमरधाम रोडने पश्चिमेकडील भाग काझी गढी, कुंभारवाडा, फकिरवाडी झोपडपट्टी घेऊन शिवाजी चौकातील साई टी स्टॉलपर्यंत.
दक्षिण: शिवाजी चौकातील साई टी. स्टॉलपासून आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील पठाणपुरा परिसर घेऊन तेथून दक्षिणमुखी मारुती मंदिर घेऊन आझाद चौकातील क्षिरसागर बंधू किराणा दुकानापर्यंत. तेथून चर्मकार लेन रस्त्याने चव्हाटा देवी चौकातील देवी मंदिरापर्यंत. तेथून चव्हाटा चौकातील सार्वजनिक मुतारीपासून संत नामदेव पथावरील अदमशहा चौकातील सुलेखाबी सैय्यद यांचे घर घेऊन तेथून रस्ता ओलांडून फारुख अहमद शेख यांचे घरापर्यंत. तेथून पश्चिमेकडील पिंजारघाट रस्त्याच्या उताराने दूध बाजार चौक पावेतोच्या उत्तरेकडील भाग घेऊन. तेथून रस्ता ओलांडून त्रंबक दरवाजा रोडने युनिर्व्हसल हार्डवेअर दुकानापावेतोचा उत्तरेकडील भाग घेऊन. तेथून ठाकरे रोडने पिंपळ चौकमधील बुऱ्हानी हार्डवेअर घेऊन व रस्ता ओलांडून इमिनन्स प्लायवूड घेऊन दक्षिणेकडे रुपहिरा मिनरल वॉटर घेऊन केला मंजील, हसन बानो हाईट्सपर्यंत. पुढे रसुलबाग स्लम व रसूल कब्रस्तान परिसर घेऊन पश्चिमेकडे खडकाळी चौकापर्यंत. तेथून खडकाळी सिग्नल पासून दक्षिणेकडील मुख्य ६० फुटी रस्त्याने पूर्वेकडील अप्सरा टि.व्ही. बोळीने अब्बास हसन पठाण यांचे घर घेऊन रंजना साळवे यांचे घरापर्यंत. तेथून बोळीने मुख्य ६० फुटी रस्त्यापर्यंत. तेथून मुख्य रस्ता ओलांडून पश्चिमेकडील सर्वोदय कॉलनी परिसर, हिरो होंडा शोरुम घेऊन सारडा सर्कलवरील कोहीनूर इन्स्टीटयूट पर्यंत. तेथून पुणारोडने पश्चिमेकडे प्रॉस्पर पार्क (मधुमिलन मंगल कार्यालय), अग्निशमन केंद्र घेऊन गडकरी चौकातील डी. आय.जी. बंगल्यापर्यंत.
पश्चिम: गडकरी चौकातील डीआयजी बंगल्यापासून जुना आग्रारोडने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेऊन व हॉली क्रॉस चर्च, स्टेट बँक, मेघदूत शॉपिंग सेंटर, शासकीय कन्या विदयालय, मित्र विहार, अशोक स्तंभ वरील विश्व अपार्टमेंट इमारतीपर्यंत.
प्रभाग १३





