प्रभाग १२

प्रभागाचे नाव: महात्मा नगर, लव्हाटे नगर, तिडके नगर, टिळकवाडी, शरणपूर, विसे मळा
लोकसंख्या: ५०,२५७
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ६,४५४
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ३,३२३
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
समर्थ नगर, महात्मा नगर, लव्हाटे नगर, उत्कर्ष नगर
महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी, एचपीटी कॉलेज, येवलेकर मळा, विसे मळा, रामदास कॉलनी
बॉईज टाऊन स्कूल, शरणपूर, पत्रकार कॉलनी, होलाराम कॉलनी, तिडके कॉलनी
कस्तूरबानगर मोटकरीवाडी, तुपसाखरे लॉन्स, कालिका मंदिर
ठक्कर बझार बस स्थानक, टिळकवाडी, राजीव गांधी भवन, राका कॉलनी
गौतम नगर स्लम, सिध्दार्थ नगर स्लम, मिलिंद नगर, क्रांतीनगर, महामार्ग बस स्थानक
सीमा:
उत्तर: गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलचे प्रवेशव्दारापासून गंगापूर रोडने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील परिसर घेऊन जेहान सर्कल पावेतोचा. तेथून मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन लोकमत सर्कल पावेतो. पुढे पूर्वेकडे कॉलेज रोडने जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन कॅनडा कॉर्नरवरील प्रिंटेक्स प्रिंटपर्यंत. तेथून शरणपूर लिंकरोडने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन कॅनडा कॉर्नर सिग्नल पावेतो. तेथून विराज इमारतीपर्यंत येऊन शरणपूर रोडने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग राका कॉलनी, राजीव गांधी भवन, स्नेहबंधन पार्क परिसर घेऊन सि.बी.एस. सिग्नलवरील कांतीलाल ज्वेलर्स पर्यंत.
पूर्व: सि.बी.एस. चौकातील कांतीलाल ज्वेलर्सपासून जुना आग्रारोडने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील सम्राट हॉटेल, ठक्कर बझार बस स्थानक, पिनॅकल मॉल, आयकर भवन, कालिका मंदिर, संदिप हॉटेल, महामार्ग बस स्थानक, जुने मध्यवर्ती जकात नाका गोडावून घेऊन मुंबई नाका येथे नासर्डी नदीलगत हनुमान मंदिरापावेतो.
दक्षिण: मुंबई नाक्यावरील नासर्डी नदीच्या डाव्या तिरावरील हनुमान मंदिरापासून नासर्डी नदीच्या डाव्या तिराने नदीच्या हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन आयटीआय पुला जवळील मुथा हॉस्पीटल पावेतो.
पश्चिम: आयटीआय पुलाजवळील मुथा हॉस्पीटल पासून उत्तरेकडे जाऊन मुख्य रस्त्याने जाऊन पूर्वेकडील जिल्हा उद्योग भवन घेऊन तेथून त्रयंबकरोडने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन नाशिक-सातपूर शीवेपावेतो. तेथून उत्तरेकडे नाशिक-सातपूर शीव रस्त्याने जाऊन पूर्वेकडील इंडियन ऑईल पेट्रोल पंप, महात्मानगर घेऊन. पुढे शीव रस्त्याने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेवून नाशिक-आनंदवली शिवेने गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलच्या उत्तरेसच्या प्रवेशव्दारापावेतो.

उमेदवार

Menu