प्रभाग ११

प्रभागाचे नाव: सातपूर एमआयडीसी, महाराष्ट्र हाऊसिंग परिसर, सातपूर गावठाण परिसर
लोकसंख्या: ४४,८७५
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): १५,०४७
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ३,६३८
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
प्रबुध्द नगर झोपडपट्टी, एमआयडीसी परिसर
महाराष्ट्र हाऊसिंग परिसर, संतोषी माता नगर
एमआयडीसी कॉलनी, आयटीआय, स्वारबाबा नगर
सातपूर गावठाण, सातपूर राजवाडा, महादेववाडी, कामगार नगर
सीमा:
उत्तर: शिवाजीनगर चौकातील सुयोजीत बायोटेक कंपनीपासून पूर्वेकडे जाऊन एमआयडीसी हद्दीने (भवर मळा सोडून) दक्षिणेचा परिसर घेऊन पाईपलाईन रोडपर्यंत. तेथून दक्षिणेकडे रस्त्याने जाऊन आनंद आय-पॉवर लिमिटेड कंपनीपर्यंत. पुढे पूर्वेकडील रस्त्याने जाऊन दक्षिणेकडील कामगार नगर परिसर घेऊन ऋषभ इन्स्ट्रमेंटस लि. कंपनी घेऊन वनविहार कॉलनीच्या दक्षिण हद्दीने व आई बंगलो घेऊन सातपूर नाशिक शीवे पर्यंत.
पूर्व: सातपूर-नाशिक शीवेवरील वनविहार कॉलनीतील आई रेसिडेन्सीच्या दक्षिण हद्दीपासून दक्षिणेकडे जाऊन शीव रस्त्याने पश्चिमेकडील परिसर घेऊन त्रंबक रोडपावेतो. तेथून पश्चिमेकडे जाऊन त्रंबक रोडने उत्तरेकडील परिसर घेऊन आय.टी.आय. सिग्नल पावेतो. तेथून दक्षिणेकडे जाऊन मुख्य रस्त्याने जाऊन रस्त्याच्या पश्चिमेकडील आय.टी.आय. परिसर घेऊन नासर्डी नदीवरील पुलापर्यंत.
दक्षिण: नासर्डी नदीवरील आयटीआय पुलापासून नासर्डी नदीच्या डाव्या तीराने नदीच्या हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील परिसर व शिवम टॉकीज, महादेव वाडी परिसर घेऊन (गणेश अपार्टमेंट वगळून) त्रंबकरोडपर्यंत. तेथून पुढे त्रंबकरोडने उत्तरेकडील परिसर घेऊन सातपूर कॉलनी सर्कल पर्यंत. पुढे सातपूर कॉलनी सर्कल पासून उत्तर दिशेकडे छत्रपती विदयालयाच्या उत्तर-पश्चिम हद्दीच्या रस्त्याने श्री आई माता स्वीट घेऊन किसन खताळे यांच्या घरापर्यंत. तेथून सातपूर कॉलनी मुख्य रस्त्याने उत्तरेकडील परिसर घेऊन मनपा मार्केट, आठ हजार कॉलनी, आनंदछाया बस स्टॉप समोरील मंगल प्रेम निवासपर्यंत. तेथून उत्तरेकडे जाऊन पुर्वेकडील परिसर घेऊन दक्षिणमुखी इच्छापुर्ती साईनाथ मंदिराजवळील श्री समर्थ निवास पर्यंत. तेथून महिंद्रा कंपनीच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यापर्यंत.
पश्चिम: महिंद्रा कंपनीच्या दक्षिण-पश्चिम हद्दीपासून उत्तरेकडे रस्त्याने एमआयडीसी हद्दीने शिवाजीनगर चौकातील सुयोजीत बायोटेकपर्यंत (सातपूर-गंगापूर शीव हद्दीपर्यंत).

उमेदवार

Menu