प्रभागाचे नाव: पिंपळगाव बहुला, गावठाण, जाधव संकुल, संभाजी नगर, समता नगर परिसर
लोकसंख्या: ४५,८७१
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ४,६७७
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,२००
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्यापती):
पिंपळगाव बहुला, जाधव संकुल
संभाजी नगर, सावरकर नगर
पप्पय्या नर्सरी, विश्वास नगर, वास्तू नगर
श्रीकृष्ण नगर, अशोक नगर, विवेकानंद नगर
राज्य सहकारी कर्मचारी वसाहत
सीमा:
उत्तर: मनपा हद्दीपासून गंगापूर-पिंपळगाव शीवेने पूर्वेकडे येऊन दक्षिणेकडील मनपा जलशुध्दीकरण केंद्र घेऊन. तेथून पिंपळगाव बहुलाच्या स.नं. १८९ च्या पूर्व हद्दीच्या नियोजीत ३० मी. डी.पी. रस्त्याने दक्षिणेकडे येऊन स.नं. १२६ पिंपळगाव बहुलापर्यंत.
पूर्व: पिंपळगाव बहुला स.नं. १२६ पासून अश्विनी निवास घेऊन कॉलनी रस्त्याने उत्तरेकडे श्रीदर्शन अपार्टमेंट घेऊन पूर्वेकडे जाधव संकुलपर्यंत. तेथून दक्षिणेकडे पांडुरंग माऊली अपार्टमेंट पर्यंत तेथून त्यासमोरील कॉलनी रस्त्याने पूर्वेकडे श्री पदमालय पार्क घेऊन नानाश्री अपार्टमेंट ते शिवशंकर अपार्टमेंट पर्यंत. तेथून उत्तरेकडे कालिका डेअरीपर्यंत तेथून कॉलनी रस्त्याने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन आयडीयल अपार्टमेंट घेऊन मुख्य रस्त्यावरील सातमाऊली बस स्टॉपपर्यंत. तेथून एमआयडीसी महिंद्रा कंपनी हद्दीने दक्षिणेकडील परिसर घेऊन पूर्वेकडे जाऊन दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिरापर्यंत.
दक्षिण: नासर्डी नदीच्या तिराने पश्चिमेकडे जाऊन सातपूर-अंबड लिंकरोडवरील नासर्डी नदीच्या पुलापावेतो. तेथून उत्तरेकडे जाऊन पप्पय्या नर्सरी चौकापर्यंत. तेथून त्रंबकरोडने पश्चिमेकडे जाऊन हॉटेल अमृत गार्डनच्या पश्चिम हद्दीने (अमृत गार्डन वगळून) नासर्डी नदी तिरापर्यंत. तेथून नासर्डी नदीचे तीराने पश्चिमेकडे जाऊन पिंपळगाव बहुला परिसर घेऊन मनपा हद्दीवरील स.नं. १४५ च्या पश्चिम हद्दीपर्यंत.
पश्चिम: पिंपळगांव बहुला स.नं. १४५ च्या पश्चिम हद्दीपासून उत्तरेकडे मनपा हद्दीने जाऊन पिंपळगाव बहुला गंगापूर शीवेपर्यंत.
प्रभाग १०








